माळशिरस नगराध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेला वेढ्यात काढू नये : नगरसेविका रेश्माताई टेळे
माळशिरस (युवापर्व) : सध्या वर्तमानपत्रांमध्ये सात कोटी रुपये निधी नगरपंचायतीला आणल्याबद्दल व खासदार आमदार इतर नेत्यांचे आभार मानल्या बाबत नगराध्यक्षांनी पेपरच्या माध्यमातून बातम्या लावलेल्या आहेत त्या सर्व वाचल्यानंतर त्या संदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतर असे समोर येते की सदर कामे पूर्वीच्या टर्म बरखास्त नंतर प्रशासक नेमल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे त्यावेळचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी ही कामे मंजूर केली होती तशा पद्धती ची बातमी पेपरमध्ये आली होती व स्वतः दत्ता मामा भरणे यांनी भांबुर्डी गावच्या जाहीर सभेमध्ये ही माहिती दिली होती तरीपण राजकारणामध्ये नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळींना अंधारात ठेवून राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केलेल्या नगराध्यक्षांनी वरिष्ठांची नाराजी दूर करण्यासाठी हा सर्व प्रकार चालवल्याचे मनसे नगरसेविका रेश्मा ताई यांनी बोलताना सांगितले यावेळी बोलताना पत्रकार व नगराध्यक्ष यांच्या चुकीच्या भूमिकेचे रेश्मा ताईंनी खंडन करून सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे खोट्या बातम्या देऊन जनतेत स्वतःची व वरिष्ठ नेत्यांची वाहवा करणाऱ्या नगराध्यक्षांना या बातमीनंतर जागे होऊन असा प्रकार परत त्यांनी करू नये