अकलूज ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे ” राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ” उत्साहात साजरा
अकलूज (युवापर्व) : अकलूज ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस तथा भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. सदरच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाची संकल्पना “आयुर्वेदा इनोवेशन फॉर ग्लोबल हेल्थ ” अशी आहे.तसेच मा. सचिव ,आयुष मंत्रालय ,भारत सरकार यांची संदर्भीय पत्र व परिशिष्टा नुसार दि.३० सप्टेंबर ते दि.२९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर अकलूज ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.महेश गुडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष खडतरे, आयुर्वेद चिकित्सका डाॅ.रेश्मा देशमुख यांच्यासह रूग्नालयातील सर्व परिचारक ,परिचारीका व कर्मचारी उपस्थित होते.