वरकूटे (बु) पुत्र अन्सार यासीन सय्यद यांची पो.उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने माळीनगर ग्रामस्थांकडून सत्कार
माळीनगर (युवापर्व) : सामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या अन्सार यासीन सय्यद यांची 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत पीएसआय पदी निवड झाली आहे.महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या 2021 च्या पीएसआय परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा पात्र झाल्यानंतर मैदानी परीक्षेच्या वेळेस जखमी असल्यामुळं मैदानी परीक्षा देता आली नाही. त्यांनतर 2022 च्या परीक्षेमध्ये पीएसआय पदाला गवसणी घालण्यात अन्सार सय्यद यशस्वी झाले. पीएसआय परीक्षेमध्ये राज्यात 353 व्या रँक ने उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या अन्सार सय्यद यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
माळीनगर येथील शमशुद्दीन दगडू काझी व दिलावर दगडू काझी यांचे भाचे अन्सार यासीन सय्यद रा. वरकुटे ( बु ) यांचा सन २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पी एस आय पदी निवड झाली. या यशवंत भाच्याच हा सत्कार प्रथमतः मामा इन्नूस दगडू काझी यांच्या हस्ते त्यांच्या माळीनगर येथील निवासस्थानी करण्यात आला.
तसेच माळीनगरचे माजी सरपंच अभिमान जगताप, माळीनगर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख, उपाध्यक्ष जब्बार तांबोळी,सलीम शेख, लायक सय्यद, नागनाथ कदम,राजेंद्र लांडगे अली नदाफ,सचिन पवार अकलूजचे पत्रकार मोहसिन शेख, सा.कार्यकर्ते समीर काझी, बाबा जाधव यांनीही सत्कार करत नुतन पीएसआय अन्सार सय्यद यांना शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभ प्रसंगी चाँद शेख,अकबर शेख,जावेद पठाण,वसिम शेख, शरीफ काझी,जमीर काझी,अन्वर काझी,तौफिक काझी,मुस्तफा काझी ,मुन्ना काझी आदी ग्रामस्थांसह मान्यवर उपस्थित होते.