अकलूज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहीका ” असून अडचण , नसून खोळंबा “
प्रसूती महिलांना अतिदक्षता सुविधा उपलब्ध ठिकाणी नेण्यास मोठी कसरत
अकलुज(युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील एकमेव उपजिल्हा रुग्णालय असलेल्या अकलूज शहरात स्थानिकां सह खेड्यापाड्यातून नागरिक रुग्णालयात दाखल होत असतात. अकलूजचे उपजिल्हा रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. या परिसरातील उभ्या असलेल्या रुग्णवाहिका जीव वाचवणारे ऐवजी जीवघेण्या ठरत आहेत.
सविस्तर वृत्त असे की ,परगावाहून माळशिरस तालुक्यात हातास काम मिळावे या उद्देशाने आलेल्या जंगले कुटुंबीय हे मुळचे रा.गंगाखेड जि.औरंगाबाद येथील आहेत. या वीट कामगार कुटुंबातील महिलेला प्रसुती करता अकलूज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी महिलेला प्रसूतीनंतर अचानक श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण होत असल्याने तब्येत अचानक बिघडत चालली होती. याच उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या डाॅक्टरांनी सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात थांबून असलेल्या १०२ क्रमांकावर उपलब्ध होणारी रुग्णवाहिका चालकास संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ करत मोबाईल बंद केला .
तब्बल १.३० तासापासून रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांस हकिकत सांगितल्यानंतर तात्काळ १०८ नंबरवर संपर्क साधून ३० मिनीटात रुग्णवाहिका टेंभुर्णीहुन धावत उपजिल्हा रुग्णालयात आली. या कुटुंबीयांची हालाकिची परिस्थिती असल्याने खासगी रुग्णवाहिका परवडणारी नव्हती.मात्र याच उपजिल्हा रुग्णालयात १०२ टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध होणारी रुग्णवाहिका मागिल बाजूला थांबून होती. आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिकावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आले. खासगी रुग्णवाहिका व शासकीय रुग्णवाहक यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीचा समझोता झाला आहे का ? अशी शंका वजा चर्चा दबक्या आवाजात सुज्ञ नागरिकांतून सुरु झाली आहे.
अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात अतिगंभीर स्वरुपातील प्रसूत महिलांना इतरत्र हलवण्यास खूप हेळसांड होत आहे. या रुग्णालयातून तातडीने इतरत्र हलविण्यासाठी लिफ्ट अथवा उतार स्वरुपातील रॅम्पची आवश्यक आहे. तसेच आरोग्यसेवकांची व इतर रिक्त जागेवर नेमूणक केल्यास जनतेची होणारी गैरसोई दूर होईल.
संबंधित उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध रुग्णवाहीका ह्या “देखावा” करीता ठेवण्यात आल्या आहेता का ? याचे उत्तर उपजिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधीक्षकांनी द्यावे. खासगीत वैद्यकीय व्यवसाय करुन पूर्णवेळ शासकीय रुग्णालयात सेवा बजावत नसलेले वैद्यकिय कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे; अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आपली परखड मते व प्रतिक्रिया जरूर नोंदवा..!🙏💐