अकलूज नगरपरिषद मार्फत स्वीप अंतर्गत अकलूज आठवडे बाजार येथे मतदान जनजागृती
अकलूज (युवापर्व) : अकलूज नगरपरिषदेने स्वीप नोडल अधिकारी मा. दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाने सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी आठवडे बाजार येथे स्वीप अंतर्गत मतदान वाढविण्यासाठी आठवडे बाजार येथे मतदान सेल्फी स्टॅन्ड लावून जनजागृती केली. तसेच आठवडे बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून मतदान शपथ पत्र भरून घेण्यात आले.
अकलूज येथील आठवडे बाजार हा तालुक्यातील सर्वात मोठा बाजार असल्याने तालुक्यातील सर्व नागरिक बाजार साठी अकलूज येथे एकत्रित येतात त्यामुळे ठिकाणी गर्दी होत असल्याने मतदान जनजागृती मोहीम राबविण्याचे आयोजित केले होते.
या जनजागृती मोहिमेमध्ये 731 लोकांनी शपथपत्र देण्यात आले व जवळपास 700 लोकांनी सेल्फी स्टैंड वर सेल्फी घेतली.कमी झालेले मतदान कसे वाढवता येईल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदान होईल याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेचे सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी पवन भानवसे, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी मनोज गवळी, सुनील काशीद, जवान चव्हाण व विद्युत विभाग कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.