विधानसभेला “मुस्लिम” फॅक्टर निर्णायक ठरणार..! ” मुस्लिमांची केवळ मत हवेत, प्रतिनिधीत्व का नको ?
सोलापूर मध्य सह राज्यातील मुस्लिम बहुल मतदारसंघातून उमेदवारीवरून बंडाळीची शक्यता !
काँग्रेस, रा.काँग्रेस (शप) व शिवसेना (उबाठा) या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील मुस्लिम समाजातील इच्छूक १२ उमेदवारांपैकी एकास सोलापूर मध्य मतदारसंघातून उमेदवारी द्यावी स्थानिक पातळीवरुन मागणी होत आहे. सोलापूर शहरासह ११ मतदारसंघात उमेदवारून बंडखोरीचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील विविध मतदारसंघातून मुस्लिम समाज हा उमेदवारीस आग्रही असताना महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजास ” वेट अॅण्ड वाॅच ” च्या भुमिकेने निराशाच पदरी पडली आहे.
राज्यातील आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत महाविकास आघाडी व महायुती दोन्ही पक्षांत बंडाळी मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. अशांतच लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य विधानसभेत मिळतीलच याची खात्री नाही. लोकसभेपूर्वी पुसेसावळी व नंतर विशालगड दंगलीतून जातीयवाद, गोहत्या व माॅब लिंचींग सारख्या घटनेतून सावरून भाजपाविरोधी एकवटलेल्या मुस्लिम समाजाने देशभरात इंडिया व राज्यात महाविकास आघाडीस प्राबल्य व गतवैभव प्राप्त करून दिले. मात्र राज्यात सध्या विधानसभेत काँग्रेस, रा.काँग्रेस शप व शिवसेना उबाठा समीकरणातून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीने मुस्लिमांच्या मते मिळवत विजयी झाले ; परंतु त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून अपेक्षा भंग झालेला ” मुस्लिम फॅक्टर ” विधानसभेत सर्वच पक्षांचे गणित नक्कीच बिघडवू शकते हे तितकेच सत्य आहे.
मुस्लिमांसमोर बॅरिस्टर असदुदीन औवैसी यांच्या एमआयएम पक्षाचे पर्याय उपलब्ध असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारीकडे आग्रही असून त्यांना केवळ फोडणीतील कडीपत्ता प्रमाणे वागणूक दिली जात असल्याने मुस्लिमांची मते दुरावण्याची दाट शक्यता नाकरता येवू शकत नाही. भारतीयांना संविधानाने दिलेला मताचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार बजावत मुस्लिम समाजाने ही राज्यातील सोलापूर मध्य व दक्षिण, हडपसर,भिवंडी,औरंगाबाद मध्य व पूर्व,धुळे,मालेगांव, बीड , नांदेड, लातूर, उस्मानाबाद ,मिरज ,सांगली ,वांद्रे,भायखळा,अहमदनगर,मुंब्रा सह एकुण ५७ जागा ह्या २१ – ५३ टक्के पर्यंत मुस्लिम मतदारांचा प्रभाव पाहण्यास मिळणार आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर मुस्लिम समाजातील ज्येष्ठ पुरूष – महिला व युवक मतदारांनी सन्मानाने सत्तेत वाटा दिल्यास त्याच पक्षाकडे झुकते माप देवू अशी चर्चा ग्रामीण व शहरी मतदारसंघातून होत असताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी,महायुती व तिसरी आघाडी,वंचित ,एमआयएम या सर्वच पक्षाची गोची होवून अपक्ष उमेदवार विरूद्ध सर्व पक्षीय असे नवीन समिकरण अख्ख्या महाराष्ट्रात पाहण्यास मिळणार ; यात दुमत नाही.
लेखन ✍️मोहसिन शेख संपादक – युवापर्व न्युज मो.7387531075