हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहीम अंतर्गत जनजागृती रॅली
अकलुज (युवापर्व) : केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियान घेण्याच्या आलेल्या सूचनेप्रमाणे आज अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार अकलूज नगरपरिषद सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे हर घर तिरंगा जनजागृती रॅली चे सकाळी 10 वाजता अकलूज नगरपरिषद कार्यालय येथून प्रारंभ करण्यात आला.
अकलूज नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात विवीध माध्यमांचा प्रभावी पणे वापर करून अकलूज नगरपरिषद वतीने अभियानाची जनजागृती ,प्रसिद्धी करण्यात येत आहे.नगर परिषद घंटागाडी मार्फत सर्व गावात घरोघरी,दुकानी ऑडियो क्लिप स्पीकर वरती वाजवून प्रसार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अकलूज नगरपरिषद कार्यालय, विजय चौक, गांधी चौक, सदुभाऊ चौक मार्गे जुने बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपरिषद कार्यालय समोरील किल्ला शाळा येथे रॅली आल्यानंतर शाळा परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले.त्यानंतर तिरंगा शपथ सर्व कर्मचारी,शिक्षक वर्ग, आणि विद्यार्थांना देण्यात आली. त्यानंतर शासनाच्या वतीने प्रसारीत करण्यात आलेले तिरंगा अँथम वाजवून व नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.