अकलूज (युवापर्व) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व सहायता वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ईद ए मिलाद” निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घघाटन अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पांडुरंगभाऊ चांगोजीराव देशमुख व अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अकलूज शहर व परिसरातील ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे शांतता,समानता व मानवता विचारांतून एकवटलेले शहरातील मुस्लिम समाजाचे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नगरपरिषद सभागृह येथे केले असल्याचे रा.काँग्रेस शप पक्ष विधानसभा कार्याध्यक्ष तथा सहायता वेलफेअर फाऊंडेशन अध्यक्ष मोहसिन शेख यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरास यावेळी अकलूज नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांनी ही रक्तदान करत रक्तदानाचा हक्क बजावला. यावेळी सहायता वेलफेअर फाऊंडेशन उपाध्यक्ष इन्नूस बाबा सय्यद,सहसचिव समीर काझी,सदस्य फारूक शेख, मोहिद्दीन (पप्पू )शेख, वसिम पटेल,रियाज शेख,इजाज मुजावर,जैद तांबोळी,सुजीत गायकवाड,सुरेश भाऊ गंभीरे, टाईम्स ९ चे संपादक नौशादभाई मुलाणी, नाजिरहुसेन मोहोळकर,अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य दादाभाई तांबोळी, साजिदभाई सय्यद,भैय्या माढेकर,छोटा जावेद बागवान, शशीकांत भोसले,मौलाली मकानदार,सद्दाम मकानदार ,शाहरूक शेख,शाहबाज काझी यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे माळशिरस प्रतिनिधी श्री.वाघमोडे व इतर प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले.
1 n