तरुण भारत संवाद च्या “दुर्गाशक्ती” पुरस्काराने श्रीमती जगूबाई जानकर सन्मानित
तरूण भारत संवाद परिवाराकडून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १० महिलांचा सन्मान
सोलापूर (युवापर्व): सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या टिळक स्मारक सभागृहात तरुण भारत संवाद च्या “दुर्गाशक्ती” पुरस्काराने श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांना सन्मानित करण्यात आले. बेळगाव दैनिक तरुण भारत चे संस्थापक संपादक कै. बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलनाने सन्मान सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी तरुण भारत संवाद चे संपादक विजय कुमार देशपांडे यांनी प्रास्ताविकाद्वारे दैनिक तरुण भारताचा लेखाजोखा मांडला.
तरुण भारत संवाद मीडिया परिवाराच्यावतीने तरंगफळ ग्रामपंचायतच्या विद्यमान ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर (महाराष्ट्र शासनाचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्राप्त) यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करीत असलेल्या विविध क्षेत्रातील 10 महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. जिल्हा शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे व ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या हस्ते हा “दुर्गामाता सन्मान पुरस्कार 2023” वितरण सोहळा थाटाने संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे लोकमान्य को-ऑप.बँकचे शाखा व्यवस्थापक सुरेश वडगावकर, तरुण भारत संवाद संपादक विजयकुमार देशपांडे, युवाशक्ती आघाडीचेप्रियदर्शन साठे, जाहिरात प्रमुख सुरेश बद्रे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये पंढरपूर येथील श्रीमती पुष्पलता निकम, पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य सौ. नागरबाई साठे, सौ प्रतिभा गोफणे (महिला शहराध्यक्ष भाजपा कुर्डूवाडी), सोलापूर शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. पुनम गोरे नामदे, सौ. तेजाबाई मिटकर (सरपंच वागदरी तालुका तुळजापूर), डॉक्टर वर्षा काणे (स्त्री रोग तज्ञ पंढरपूर), कु. शितल म्हेत्रे (संस्थापिका अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन अक्कलकोट), डॉ. अमिता कोरके(सचिवा जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर वैराग),प्रा.डॉ. मुमताज शेख (ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर) इत्यादी विविध क्षेत्रातील नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यासाठी माळशिरस तालुक्यातील रत्नप्रभादेवी मोहीते पाटील बहुद्देशीय सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख जानकर, ग्रामविकास अधिकारी संतोष मल्हारी पानसरे, जांभूड ग्रामपंचायत माजी सरपंच पांडुरंग बाबा नायकुडे, महापारेेेषण सोलापूरसहाय्यक अभियंता सागर परमेश्वर बनसोडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय दत्तू हुलगे, तरंगफळ ग्रामपंचायत माजी सरपंच सुजित शांतीलाल तरंगे, पत्रकार सौ. शोभा तानाजी वाघमोडे,भानुदास जानकर, विजय जानकर ,सौ. रेखा प्रकाश खताळ, छायाचित्रकार शशिकांत म्हमाणे,जेष्ठ पत्रकार अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .