ओंकार साखर कारखान्याच्या पहिल्या ५ साखर पोत्यांचे पुजन
दिवाळीसाठी शेतकरी व कामगारांना मोफत साखर
अकलूज (युवापर्व) : ओंकार साखर काखाना चांदापुरी युनिट एक चालु गळीत हंगामातील उत्पादीत साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पुजन ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांत बोञे-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की , ओंकार साखर परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपपदार्थ निर्माती प्रकल्प , कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ, इथेनॉल व वीज प्रकल्प, कंपोस्ट खत ,पेट्रोल पंप यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ऊसाचा पहिला हप्ता २७०० रूपये जाहीर करून शेतकऱ्यांना व कामगारांना दिवाळीसाठी मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. तरी परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला गाळपा साठी घालावा असे आवाहन प्रशांत बोञे पाटील यांनी केले .
यावेळी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ , जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे , ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर , चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते , केन मॅनेजर शरद देवकर , सुरक्षा आधिकारी मोहन घोडके , धनाजी पवार , धन्यकुमार जमदाडे , रमेश आवताडे , विजय जगदाळे , गणेश शितोळे यासह आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.