वंचितकडून शिरूर तालुका संविधान सभेची जय्यत तैयारी बैठक संपन्न
शिरूर (युवापर्व) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या पुणे जिल्हा प्रभारी प्रा किसन चव्हाण यांच्या आदेशाने २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या संविधान सभेच्या नियोजनसाठी प्रत्येक तालुक्यात संविधान सभा बैठकीचे आयोजित करून तालुका कार्यकारणीला माहिती देणे या संदर्भात दि.२२ नोव्हेंबर रोजी पुणे पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव सतीश साळवे, संपर्क प्रमुख ॲड वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित पाडळे, जिल्हा सचिव गोविंद कांबळे व जिल्हा संघटक विश्वनाथ घोडके, सुजय रणदिवे जिल्हा कार्यकारिणीतील शिरूर तालुका तालुका दौरा करून २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या संविधान रॅली विषयी माहिती देवून चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी यांना जास्तीत जास्त संख्येने संविधान सभेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व कार्यकारणी मध्ये नवनियुक्त जिल्हा महासचिव सतीश साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित पाडळे, जिल्हा सचिव गोविंद कांबळे व जिल्हा संघटक विश्वनाथ घोडके यांचा सत्कार शिरूर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदरच्या बैठकीस तालुका अध्यक्ष जितेंद्र जगताप, तालुका महासचिव अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमास सह सचिव शांताराम कांबळे,विनोद जगताप,भारतीय बौध्द महासभेचे शशिकांत जगताप,गौतम पठारे,पोपट चव्हाण,अनिल शेलार,वंचित बहुजन आघाडी सणसवाडीचे प्रसंजीत लोणे,गौतम मोरे,सुधाकर लोखंडे तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.