अकलूज(युवापर्व) :अकलूज येथील सामाजिक व्यक्तिमत्व महेश सुर्यवंशी यांच्या कल्पक विचार सरणीमुळे अकलूज येथे ४९ दांम्पत्यांनी अधिक मास निमित्त धोंडे जेवणाचा आस्वाद घेतला. रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी अकलूज येथील पाटीदार भवन येथे अधिक – श्रावण मास निमित्त ४९ लेक जावाई जोडप्यांसाठी धोंडे जेवणाचा उपक्रम राबवण्यात आला होता.हा उपक्रम बुरुड समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था अकलूज व अकलूज शहर बुरुड समाज यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक – श्रावण मासनिमित्त अकलूज मधील बुरुड समाजाच्या सर्व घरातील ८१ लेक जावाई यांना निमंत्रित करण्यात आले होते. यापैकी ४९ लेक जावई उपस्थित राहिले. यावेळी बुरुड समाजातील दहावी बारावी व ग्रज्युएशन पूर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळाही घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोरसिंह माने – पाटील व त्यांच्या पत्नी सौ. शर्मिलादेवी किशोरसिंह माने – पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, चंद्रकांत वडतिले, चंद्रशेखर सूर्यवंशी, बुरुड समाज उत्सव समिती अध्यक्ष आकाश सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अकलूज शहर बुरुड समाज २०२३ – २०२४ चे वार्षिक उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विशेष सत्कार म्हणून सेवानिवृत्त कलप्पा दिगंबर सूर्यवंशी यांचा करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आकाश सावंत यांनी केले. प्रास्ताविक व आभार महेश सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीश सूर्यवंशी यांनी केले.