ओवर कॉन्फिडन्स मराठी चित्रपट निर्मात्यांच्या अंगलट येऊ शकतो- निर्माता योगेश घोलप
मुंबई (युवापर्व) : उम्मीद फिल्म प्रोडक्शन निर्मित विघ्नहर्ता मल्टीस्टेट को अपडेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांची निर्मिती असलेला “अहम” या मराठी चित्रपटाची डेट १२ मे फायनल झालेली असून याच दिवशी एकूण महाराष्ट्रात पाच मराठी चित्रपट रिलीज होत आहेत. त्यातून पश्चिम महाराष्ट्रातील चार चित्रपट त्याच दिवशी रिलीज होत आहेत. याचा फटका सर्वच निर्मात्यांना बसणार आहे. जर सर्व निर्माते एकत्र येऊन मागेपुढे तारका घेतल्यास याचा सर्वांना फायदा होईल. जर बॉलीवूड वाले तारकाचे ॲडजस्टमेंट करू शकतात तर मराठी इंडस्ट्री वाले का करू शकत नाहीत ? असे हे योगेश घोलप म्हणाले. यासाठी सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले. यातून मार्ग निघला तर ठीक नाहीतर १२ मे ला अहम रिलीज होणार आहे. याची उत्सुकता प्रेक्षकांसह सर्वांनाच आहे.
पुढे योगेश घोलप म्हणाले की सध्या मराठी इंडस्ट्रीला वाईट दिवस आहेत. त्यामध्ये जर निर्मात्यांनी एकमेकांचं न ऐकता असे निर्णय घेतले तर अंगलट येतील; त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन तारकांचे ॲडजस्टमेंट करावी. “अहम” चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी जोरदार चालू आहे. अमीर शेख, मृणाली कुलकर्णी हे नवीन जोडी घेऊन आसिफ अब्दुल भाई तांबोळी यांनी डायरेक्शन केलेले डॉक्टर विकास सावंत सुनील माने यांची मुख्य विलन असलेले तगडी फिल्म १२ मे लाच रिलीज होत आहे.