Uncategorizedमनोरंजनमहाराष्ट्र
Trending
“अहम” या मराठी चित्रपटाचे बॉलीवूड टाॅलीवुड बरोबर मराठी चित्रपटाला तगडे आव्हान
मुंबई (युवापर्व) : मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच “अहम” या मराठी चित्रपटामध्ये एकही स्टार कास्ट नसताना नवीन चेहरे अमीर शेख,मृणाली कुलकर्णी या नवीन जोडीला घेऊन हा चित्रपट बनवलेला. “अहम” हा चित्रपट येत्या १२ मे ला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे. या चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्रभर प्रमोशनची जोरदार तयारी सुद्धा चालू आहे.
यासाठी निर्माता योगेश घोलप, डायरेक्टर आसिफ अब्दुल भाई तांबोळी व एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन हेड पांडुरंग शिंदे हे रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. सध्या त्यांच्या प्रमोशनची तयारी पाहता भल्याभल्या निर्मात्याला घाम फुटेल अशा पद्धतीचे प्रमोशन सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. अशा पद्धतीचा जोरदार प्रमोशन सुरू ठेवल्यास हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास यशस्वी ठरेल यात शंका नाही.