आपले शहरचालू घडामोडीविशेष
Trending

अकलूज शहरातील बेकायदेशीर अवजड वाहन वाहतूकीवर कारवाया कधी ?

पोलीस प्रशासन आठवडा बाजारात आलेल्या वाहनांच्या "एन्ट्री वसुली"त व्यस्त

अकलुज(युवापर्व): शहरातील विविध अवैध वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी सपशेल फेल ठरल्याचे दिसून आले आहे. यातच पोलीस प्रशासन जनावरांची वाहतूक,प्रवासी वाहतूक,अवैध गौणखनिज व अवजड वाहतूक यांसारख्या वाहतूक करणाऱ्यावर मेहरबान असल्याचे दिसून आले आहे. अशातच मध्यरात्रीत वाहतूक करणारे असंख्य ट्रॅव्हल्स अकलूजहून पुणे-मुंबईकडे जाताना ह्या हप्तेखोर अधिकाऱ्यांचे शिकार होत आहेत.

अकलूजच्या आठवड्या बाजार दिवशी ४० -५० हजारांहून अधिक पैशांची विना पावती एन्ट्री वसुली जोरात सुरु असते. याबाबत मा.जिल्हा पोलिस अधिक्षक यानी दखल घेवून संबंधित वाहतूक शाखेवर करडी नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच शहरातून रात्री अपरात्रीत गौणखनिजाची होणाऱ्या अवजड वाहतूकीवर अद्यापही स्थानिक पोलिस प्रशासन मूग गिळून गप्प आहेत.

सोलापुर जिल्ह्याची आर्थिक राजधानी असलेल्या अकलुज शहरात पदभार स्वीकारण्यास मोठी स्पर्धा यापूर्वी ही पाहण्यास मिळाली आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या अति महत्त्वाची जबाबदारी मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनातून बोली लावून जबाबदारी देण्यात येत आहे का ? अशी चर्चा दबक्या आवाजात का होईना शहरात सुरु आहे. सध्याया बेशिस्त अनियंत्रित वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याचे तगडे आव्हान पोलिस प्रशासना समोर आहे.

अशी केली जाते वसुली..,

बाजार एन्ट्री २००, प्रवासी ५००,जनावरे वाहन ३००० प्रति महिना,अवैध वाहतुक ५०००,दुचाकी विनापावती १००-२०० रुपये अशा पद्धतीने लाखो रुपयांची वसुली सक्तीने सुरु असते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button