कळस(युवापर्व): वंचित बहुजन आघाडी तर्फे कळस या गावांमध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी भारतामध्ये सर्वात जास्त जनसंख्या असलेल्या धनगर समाजाला कुठल्याही प्रकारे लोकसभेवर राज्यसभेवर किंवा विधानसभेवर त्या त्या प्रमाणात इथला प्रस्थापित पक्ष जाऊ देत नाही. धनगर समाजाचा वापर फक्त मतदानासाठी केला जातो. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये धनगर समाजाला एससी प्रवर्गामध्ये आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिले जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एनटीसी मध्ये ठेवले जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे धनगर समाजाच्या हिताच्या दृष्टीने योजना राबवल्या जात नाहीत.
परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्वात जास्त उमेदवार धनगर समाजाचे दिले व इथल्या प्रस्थापित पक्षांना धक्का दिला. त्यामुळे धनगर समाजाने स्वतःच्या हक्काचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे वळण्याची गरज असून त्याशिवाय धनगर समाजाचे राजकीय उन्नती होणार नाही. धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी ने कुजवलेले आहे. त्यामुळे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये यावे व स्वतःचा पक्ष म्हणून काम करावे असे मत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी मत व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी कळस शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने पार पडले.या कार्यक्रमास जिल्हा संपर्कप्रमुख ॲड वैभव कांबळे, सहसचिव सतीश साळवे, गोविंद कांबळे, ॲड संतोष कांबळे पत्रकार मनोज साबळे, प्रसिद्धी प्रमुख रेवण वेताळ व कळस शाखेचे शाखा अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, राहुल कांबळे, कार्याध्यक्ष संभाजी उगले, रमेश कांबळे, प्रवीण कांबळे, गणेश मोरे, अमजद सय्यद, शेखर कांबळे व सर्व ग्रामस्थांनी आयोजन केले होते.