आपला तालुकामहाराष्ट्रराजकारणसमाजकारण
कै.मा.आ.चांगोजीराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी
अकलूज (युवापर्व) : महाराष्ट्राच्या इतिहासात बिनविरोध आमदार अशी ओळख असलेले माळशिरस विधानसभा मतदार संघातून १९७२ साली बिनविरोध विधानसभेवर निवड झालेले कै मा.आ.चांगोजीराव आबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस हार घालून पुष्पार्पण करत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सर्वांना सामावून घेत समाजकारण करण्याची काकासाहेबांची शिकवण नक्कीच प्रेरणादायक आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मा.पांडुरंग भाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, शहराध्यक्ष सुरेशभाऊ गंभीरे, युवक ता.उपाध्यक्ष जाकिर शेख,काँग्रेसचे रघुनाथ साठे,पत्रकार सुनिल कांबळे,नाना जगताप सह आदी मान्यवर उपस्थित होते.