ऊसाला प्रथम उचल जाहीर करणाऱ्या कारखान्याचे कार्यकरी संचालकांचा प्रा.कुलाळ यांच्याकडून सत्कार
खुडूस (युवापर्व) : दि.२४ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुक्यातील सर्व कारखान्याचे चेअरमन यांना प्रा.सतीश कुलाळ यांनी पहिली उचल व दर जाहीर करूनच उसाचे गाळप करावे असं पत्र दिले होते आणि जे चेअरमन सर्वात आधी दर जाहीर करतील त्यांचा जाहीररित्या सन्मान करू अशा आशयाचे पत्र दिले होते. सर्वात आधी दर जाहीर करणारे श्री सद्गुरु राजेवाडी,पांडुरंग श्रीपुर,ओंकार चांदापुरी,दि सासवड माळीनगर यांचे चेअरमन व प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष साखर कारखान्यावर भेटून सत्कार करण्यात आला.
सहकार महर्षी यांनी सगळ्यात शेवटी उचल जाहीर करून सर्वात कमी उचल दिल्याबद्दल सहकार महर्षी समोर २४ तासाचे आमरण उपोषणाच्या आंदोलन केले होते. परंतु इतर कारखान्याबरोबर दर देण्याचे व वजन काटा यांचे लेखी हमीपत्र देण्याचे टाळले. त्यामुळे या कारखान्याची चेअरमन यांना अनोख्या पद्धतीने हटक्या स्टाईल सतीश कुलाळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आता जरी शेतकरी काही बोलू शकत नसतील परंतु शेतकरी मत पेटीतून नक्कीच आपलं मत आणि आशीर्वाद देतील अशा भावना सतीश कुलाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. जयसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो! त्यांच्या शिवाय शेतकऱ्यांची भरभराट होणार नाही ; असा मार्मिक टोला कुलाळ यांनी लगावला आहे.