अखेर ठरलेल्या वेळेनुसार अकलूजच्या मुस्लिम दफनभूमीचे भूमिपूजन संपन्न
अकलूज (युवापर्व) : अकलूज मुस्लिम समाज दफनभूमी विकासकामाचे भूमिपूजन कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी सायं.५.१० मिनिटाने दफनभूमी लढ्यातील बांधवांच्या हस्ते संपन्न झाला. अकलूज नगरपरिषद प्रशासनाने पाठपुरावा केलेल्या आंदोलकांनाच डावलल्याने भूमिपूजन कार्यक्रमाचा डाव एक दिवसापूर्वीच आंदोलकासह सर्व पक्षीय नेत्यांनी उधळून लावला. अकलूज शहराच्या विकासकामात प्रत्येक समाज घटकाला सोबत घेणे गरजेचे असताना स्थानिक पातळीवर मुस्लिम बांधवांनी मिळवलेल्या निधीचा श्रेय लाटण्याचे काम सुरू झाले आहे.
अकलूज नगरपरिषद प्रशासनाने लढ्यात अग्रस्थानी असलेल्या मुस्लिम समाज बांधवांना डावलून बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीचे वेळोवेळी होत असलेले हस्तक्षेप संघर्षातील बांधव कदापि खपवून घेणार नाहीत. यामुळे शहराच्या मुस्लीम समाजात नाराजीचा सुर गवसत आहे. यावेळी भूमिपूजन करताना रा.काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, रा.काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेशभाऊ गंभीरे, वंचितचे ता.अध्यक्ष अभिजीत गायकवाड, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस साजिदभाई सय्यद, रा.काँग्रेस युवक शहराध्यक्ष जाकिर शेख, जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे समन्वय मोहसिनभाई शेख ,पीरखान शेख, सलमान कुरेशी,फारूख शेख,इन्नूस सय्यद, वसिम पटेल आदी उपस्थित होते.