आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रसमाजकारण

माळीनगर येथील मुस्लिम दफनभूमीच्या हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची ग्रामस्थांची मागणी

अकलूज (युवापर्व) : मौजे माळीनगर येथील मुस्लिम दफनभूमीच्या जागेवर जाणूनबुजून वैयक्तिक स्वार्थापोटी बेकायदेशीर अतिक्रमण करून विटभट्टी चालवणारे चालक समाजाला सतत वेठीस धरत आहेत. तसेच दफनभूमीची विटंबना करणारे ह्या चालकांवर तात्काळ कारवाई व्हावी; याबाबत माळीनगर-सवतगव्हाण मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने अकलूज पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

    माळीनगर येथे मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी सर्व्हे नं. २/१/९७.१९. ही जागा शेती महामंडळाची दफनभूमीसाठी खरेदी करून देण्यात आलेली आहे. सदरच्या दफनभूमी हद्दीत बालिस सरदार शेख, सलीम निजाम शेख, इब्राहीम निजाम शेख, वलीम निजाम शेख यांनी अतिक्रमण करून अवैध वीटभट्टी राजरोसपणे अनेक वर्षांपासून चालू केलेली आहे. या ठिकाणी वीटभट्टीसाठी लागणारे राख भुसा,कोळसा,पोयटा, माती हे सर्व कबरी वरती टाकणे, ट्रॅक्टर कबरीवरून फिरवणे असे वाईट कृत्य वारंवार संबंधितांकडून होत असल्याने परिणामी मयतांची विटंबना होण्याचे प्रमाण वारंवार वाढतच आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून समाजातील जेष्ठ व जाणकार लोकांनी त्यांना बोलावून तडजोड करण्याचे ठरवले होते; त्याप्रमाणे तडजोड झाली व सर्वानुमते तडजोड झालेल्या जागेमधून समाजामार्फत जेसीबी च्या साह्याने २ x २ आकाराची चारी खणून घेतली व ती चारी बालिस सरदार शेख यांनी  मान्य ही केली. परंतु सलीम निजाम शेख व त्यांचे दोन बंधू यांनी दुसऱ्या दिवशी सदरची चारी बुजवून टाकली.

          समाजातील जेष्ठ व जाणकार लोकांनी ठरल्याप्रमाणे अतिक्रमण वाद मिटलेला असताना पुन्हा का अडकाठीपणा करताय असे विचारले असता त्यांनी अर्वाच भाषा वापरत शिवीगाळ करून दमदाटी करत जीवे मारण्याची संबंधितांना धमकी दिली. याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देवून झालेले अतिक्रमण काढावे अन्यथा भविष्यात जनआंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम समाजच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अकलूज पो.स्टेशनचे  सहाय्यक पो.निरीक्षक जाधव यांना अतिक्रमण कारवाईचे पत्र देताना माळीनगर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख ,उपाध्यक्ष जब्बार तांबोळी, सचिव सलिम शेख ,खजिनदार लायक सय्यद,शरीफ काझी, रियाज मुलाणी,महंमद शेख,बशीर बागवान सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button