अकलूजमध्ये गांधी जयंती, ड्राय डे दिनी ” गुपचूप ” मद्यविक्री सुरू
अकलूज : २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. परंतु याच दिनी देशभरात ड्राय डे पाळण्यात येत असतो. मात्र राज्य उत्पादन शुल्क अधिनियमा नुसार मद्यविक्री करण्यास बंदी असताना अकलूज शहरात शिट्टीच्या माध्यमातून हाक देत मद्यशौकीनांना गुपचूप विविध प्रकारच्या नामांकित कंपनीचे मद्य पुरवठा केला जात आहे. असाच एक प्रकार शहराच्या नविन बसस्थानका मागिल हाॅटेल ” गुपचूप ” मध्ये सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
हा सर्व मद्यविक्रीचा प्रकार शहराच्या प्रशस्त हाॅस्पिटल परिसरात घडत असून यांवर अजून प्रशासकिय यंत्रणा गप्प का ? असा सवालही सुज्ञ नागरिकांतून केला जात आहे. शहरातील महावीर स्तंभ ते बायपास रोडला जाणाऱ्या या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांचा वावर कमी असल्याने त्यांना अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने मद्यविक्रीची पावर मिळत आहे की काय अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. ” ड्राय डे ” ला ” सेलिब्रेट डे ” साजरा करणाऱ्या चालकाची अनुज्ञाप्ती रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शहरातील जागरूक नागरिकांकडून एक्साईज विभागाच्या प्रत्येक कारवाई होते की दिलजमाई या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन आहेत.
युवापर्व न्यूज कडून ” ड्राय डे ” चे उल्लंघन झाल्याने चालकावर कारवाई व्हावी ; याबाबत संपर्क साधताच संबंधित एक्साईज विभागाचे अधिकारी श्री.संदिप कदम यांनी सांगोला तालुक्यात धडक कारवाई सुरू असल्याचे सांगितले. अकलूज शहरातील ड्राय डे पालन न केलेल्या घटनेकडे सरळ कानडोळा केल्याचे बोलण्यातून दिसून आले. शहरात राजरोसपणे गुपचूप सुरू असलेली मद्यविक्री वर कारवाई बाबत राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उदासिन असल्याचे दिसून येत आहे.