भोंडला कार्यक्रमातून स्ञी शक्तीच्या एकीचा जागर होतो – निशा गिरमे
अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे भोंडला कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका निशा गिरमे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ याच्या हस्ते हत्तीचे पूजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविकात भाग्यश्री गुजरे यांनी भोंडला सणाचे महत्व व वेगवेगळ्या परंपरा या विषयी माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्याचा सत्कार नकुसा वाघमोडे यांनी केला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निशा गिरमे यांनी आपल्या मनोगतात भोंडला सणाच्या निमित्ताने सर्व महिला एकञ जमतात फेर धरतात आणि वेगवेगळ्या प्रकारची भोंडल्याची गाणी म्हणतात. यातून स्ञीत्वाच्या एकीचा जागर होतो.मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देणारा व निसर्गाप्रती आदर व्यक्त करणारा कार्यक्रम खिरापतीच्या स्वादाने फुलून येतो असे विचार व्यक्त केले.
प्रशालेतील विद्यार्थीनी श्रीजा पत्की, राजेश्वरी जाधव,शामबाला सावंत यानी पारंपरिक गीत सादर केले. सर्व महिला शिक्षिका व मुलीनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत पारंपरिक खेळ खेळले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रचना रणवरे,हसीरूण मुलाणी, नाझिया मुल्ला, स्नेहलता एकतपूरे, प्रभावती लंगोटे व सर्व महिला शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू यांनी तर आभार सुनिता निबाळकर यांनी मानले.