अकलूजमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
अकलूज : जगाला शांततेचा संदेश देणारे, इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त अकलूज शहरात जामा मशिद बागवान जमातीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .यंदाचा शहर स्तरावरील ईद ए मिलाद या कार्यक्रमाची जबाबदारी बागवान जमातीकडे असल्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती जमातीच्या विश्वस्तांनी दिली.
” रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ” ही संकल्पना मनाशी बाळगून जेष्ठ – युवक अशा १३० रक्तदात्यांनी हजेरी लावत या रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सर्वधर्मिय समाज बांधवांनी सहभाग नोंदवत विविधतेत एकतेचा यावेळी संदेश दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागवान जमातीचे जावेद बागवान ,गौस बागवान ,मोहसीन बागवान ,अलीम बागवान ,तनवीर तांबोळी ,भैय्या माढेकर ,जावेद छोटू बागवान ,रहीम शेख ,जुबेर बागवान यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी जामा मशिद बागवान जमातीच्यावतीने उपस्थित बहुसंख्य रक्तदात्यांचे आभार जमातीकडून मानण्यात आले .