पुण्यातील विविध पुरोगामी पक्ष-संघटनांकडून संयुक्तपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने
पुणे : राजस्थान सुराणा येथील इंद्र मेघवाल या वर्षीय विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याच्या माठाला जातीय कारणातून खून करण्यात आला होता तसेच गुजरात दंग्याच्या वेळी बिल्कीस बानू या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिचे नातेवाईकांची व मुलीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपींची शिक्षा पूर्व सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरुद्ध आज पुणे येथील विविध पुरोगामी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संविधान परिवार तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शनाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजित निषेध सभेमध्ये भूमिका मांडताना रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केंद्र सरकार तसेच राजस्थान व गुजरात सरकारवर टीका करत असताना दलित व मुस्लिमांना सातत्याने अत्याचाराला सामोरे जावे लागले तसेच त्यांना न्याय नाकारला जाणे हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून अशा घटनांच्या विरुद्ध सर्वसमावेशक निषेध होणे आवश्यक असतानाही तसा निषेध नोंदवला जात नाही हे अत्यंत निमगाव जनक आहे तसेच अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारांनी विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केली
नरेंद्र मोदी व भाजपा परिवाराचा बिलकिस बालोप्रकरणी सुरुवातीपासूनच न्याय नाकारण्याची भूमिका राहिली असल्याने संधी मिळताच त्यांनी बिल्कीस बानुच्या आरोपींना थेट मदत करण्याचे कारस्थान करून या देशाच्या अल्पसंख्यांक समुदायाचा कायद्यावरील विश्वास दळमळीत करण्याचा प्रयत्न भाजप व मोदी यांनी केली असल्याची टीका अंजुम इनामदार यांनी केली तसेच दलित मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लवकरच सर्वसामावेशक आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी भारतीय दलित कोब्राचे संस्थापक एडवोकेट भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे, भीमआर्मी एकता मिशनचे दत्ता पोळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, मातंग एकता आंदोलन अनिल हतागडे, रिजनल ख्रिश्चन ट्रस्ट, युवक क्रांती दलच संदीप बर्वे, शिवसेना चे डॉक्टर अमोल देवडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समीर शेख, रुग्णहक्क परिषदेचे उमेश चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या प्राची दुधाने, समता परिषदचे सपना माळी, गौरी पिंगळे, सलीम बाबजान किरण रशीद , इब्राहीम खान, सगई नायर, अमजद भाई, गफार तुर्क आदी उपस्थित होते.