कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप L H B कोचेस मंजूर करून रेल्वे बोर्डाने ५११ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावे
कुर्डूवाडी : देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” घोषणे च्या माध्यमातून व सामाजिक न्याय राज्य मंत्रि रामदास आठवले यांच्या सहकार्यातून कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप मध्ये L H B कोच चे काम मंजूर करून त्यामध्ये कर्मचारी भरती रेल्वे बोर्ड ने लवकर करणे. चिंकहिल RPF ट्रेनिंग सेंटर बंद करणारे आधीकारी याची चौकशी करावी. चिंकहिल RPF ट्रेनिंग सेंटरसाठी २०१६ साली ३ कोटी निधी मंजूर करण्यात करण्यात आला होता. १ कोटी निधी फायरिंग रेंज साठी खर्च केला आहे. चिंकहिल RPF ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी स्पेशल आर्म ट्रेनिंग सेंटर महिलांसाठी चालू होणार होते ते सुरू करावे ही मागणी केली जात आहे.
तसेच कुर्डूवाडी रेल्वे गेट नं.३८ या ठिकाणी उड्डाण पूल साठी नितीन गडकरी साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्याचा सर्वे करून अहवाल दिल्लीला पाठवला आहे. उड्डाण पूल चे काम लवकर चालू करावे ;अशां विविध मागण्याचे निवेदन सामाजिक न्याय राज्य मंत्रि रामदास आठवले साहेब याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, खा.रावसाहेब दानवे, कुर्डूवाडी रेल्वे वर्क एससी-एसटीचे अध्यक्ष महेंद्र जगताप साहेब यांनी दिल्लीत रामदास आठवले साहेब आणि रावसाहेब दानवे याची भेट घेवून निवेदन देण्यात आले आहे. संघर्ष नायक महेंद्र जगताप यांच्या गल्ली ते दिल्ली वारीतून प्रलंबित कामाचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.
प्रतिनिधी,
अमोल हावळे