अकलूज : माळशिरस तालुक्यातून अकलूज मार्गे जाणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. परंतु अवजड वाहतुक करणारे सिमेंट काँक्रीट मिश्रण यंत्र वाहनाद्वारे दळणवळणाचे दैनंदिन मार्गात मिश्रीत सिमेंटची गळतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे. या पालखी मार्गाचा काम करणाऱ्या कंपन्यांना बांधकाम विभागाचा धाक राहिला नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अकलूज – टेंभूर्णी मार्गावरील अकलाई काॅर्नरजवळ दि.२५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा.च्या सुमारास वाहनातून सिमेंट मिश्रण मार्गक्रमणातील पडल्याने दुचाकी स्वारांचा जीवावर बेतणारा अनर्थ सुदैवाने टळला.तसेच या मार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. मात्र कामात कसुरपणा करणाऱ्या वाहनावर व कंपनी व्यवस्थापनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी ? अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पालखी मार्गास येणारा कोट्यावधीचा निधी रस्त्याला न जाता सिमेंटच्या हेळसांड स्वरूपात इतरत्र पडत आहे. संबंधित घडलेल्या घटनांकडे सा.बां.विभागाने लक्ष केंद्रित करून पालखी मार्गाच्या कामात होणाऱ्या गलथान कारभारावर अंकुश ठेवायला पाहिजे.
kaaxQITFNKbsltpRkdhmeJj