अकलूज (युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील अकलूज शहरामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त व महिला दिनानिमित्त अकलूज शहर परीट समाज सेवा मंडळाकडून शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व केळी,खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी एकुण १५० विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर देवून सामाजिक ऋणानुबंध जपत परीट समाज सेवा मंडळाकडून हा स्तुत उपक्रम राबविण्यात आला.
अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणा करणारे थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती “गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला ” च्या जयघोषाने अकलूज शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ” घाणीवर मात टाका ” हा स्वच्छतेचा मूलमंत्र उपस्थित विद्यार्थांना सांगण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ समाज बांधव दत्तात्रय भोसले,प्रभाकर कारंडे, शिवसेना प्रमुख संतोष राऊत, हनुमंत वाघमारे, शांतीलाल कारंडे,केंद्र प्रमुख राजेंद्र जाधव, शेखर भोसले, अशोक घोडके, संजय भागवत, देविदास कदम, सारंग मोरे, सुनील वळसे,मोहन नवले, नितीन भोसले,आनंद वाघमारे, विजय वाघमारे,माणिक नवले,विठ्ठल वरपे,तात्या माने,गजानन माने,दिपक गडेप्पा, दादा राऊत,योगेश शिंदे, बाळासाहेब पावशे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता निंबाळकर मॅडम, कैलास गायकवाड सर,हमीद मुलाणी सर यांनी सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांस कार्यक्रम आणण्यास मदत केली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शहजादी काझी मॅडम यांनी केले तर आभार शांतीलाल कारंडे मानले.