मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आमचा लढा चालूच राहणार – प्रा.मिलिंद फंड
करमाळा(युवापर्व) : मराठा समाज सहिष्णू असून सर्व जाती धर्मीयांना बरोबर घेऊन काम करणारा असून समाजाला सर्व समाजाला दिशा देणार आहे. जातीय सलोखा राखत समाजाचा पोशिंदा म्हणून या समाजाने आज पर्यंत काम केले आहे. सर्व समाजाचे कल्याण करणारा हा समाज आरक्षण नसल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित आहे. समाजाला आरक्षण न देता या समाजावर बेछुटपणे लाठी चार्ज करणारे हे सरकार असल्याचे मत प्रा. फंड यांनी व्यक्त केले . सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तहसीलदार विजय जाधव यांना समाज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून करमाळा येथील बायपास चौक येथे रविवारी सकाळी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज उपस्थित होते. या रास्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी करमाळा, मुस्लिम समाज व धनगर समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.