मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला एमआयएम पक्षाचा पाठिंबा
औरंगाबाद(युवापर्व) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे लोकशाही मार्गाने मराठा बांधव आंदोलन करत होते. त्यांच्यावर अमानुषपणे बेछूट लाठीमार आणि गोळीबार करण्यात आलेला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करून, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषीं पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी सोमवार, दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खा.इम्तियाज जलील यांनी जिल्हा बंदला जाहीर पाठिंबा दिला.
सदरच्या ठिकाणी घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची सरकारने त्वरीत पूर्तता करावी. सर्वसामान्य नागरीकांनी आपआपले आस्थापने बंद करुन राज्यातील विविध शहरातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.