देशात द्वेषाच्या वातावरणामुळे मानवी जीवन धोक्यात;आत्मक्लेश आंदोलनाद्वारे संतप्त सवाल
सोलापूर(युवापर्व) : महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने देशभरात पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,महिला, शेतकरी,शेतमजूर यांच्या विरोधामध्ये विषारी प्रचार केले जात आहे. भारत देशात एक प्रकारे द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यातून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होत आहेत. ही अंत्यंत चिंताजनक अन् गंभीर बाब आहेत. त्यामुळे मानवी मन आणि मानवतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व द्वेषाच्या वातावरणाविरोधात महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सैफन शेख यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. देशात सुरू असलेल्या विषारी राजकारणामुळे मानवी जीवन धोक्यात आले असल्याचे मत एमडी एमए चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सैफन शेख यांनी मांडले.
निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी -भारतात होत असलेल्या निंदनीय घटना तसेच निंदनीय प्रकारांविरुद्ध भारतीय नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पण त्यांची सद्सद् विवेक बुध्दी जागृत व्हावी व मानवता प्रफुल्लित व्हवी,म्हणून आत्मक्लेश आंदोलन केले असल्याची माहिती एमडी एमए चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सैफन शेख यांनी दिली आहे.
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल,मारहाण करणाऱ्या विरोधात माजी न्यायाधीश मार्फत सकल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली.यावेळी आंदोलनास पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,पत्रकार अशोकजी ढोणे, सोलापूर बामसेफ संघटनेचे बापू मस्के,पत्रकार शेख, समाजसेवक सादिक नदाफ, पत्रकार बालाजी चिटमेल, जेष्ठ पत्रकार संजय जोगीपेठकर, समाजसेवक उत्तम नवगिरे, पत्रकार वैभव गंगणे, समाजसेवक हिजाबर खान पठाण, समाजसेवक बाळू गजा, समाजसेवक मुजाहिद पठाण, पत्रकार राजू पाटील, पत्रकार सुधीर कांबळे,जेष्ठ पत्रकार इक्बाल शेख, समाजसेवक कय्युम जमादार, पत्रकार रमजान मुलांनी, समाजसेवक एजाज कोठी, युवा पत्रकार शबरोज शेख, युवा पत्रकार फैय्याज शेख, युवा पत्रकार गणेश भालेराव आणि संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे व राष्ट्रीय सचिव ॲड.अद्वैत चव्हाण हे फोन द्वारे पाठिंबा दर्शवले यांच्यासह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आंदोलनास भेट दिली.