राऊतनगरमधील अंगणवाडीला “सोशल मिडिया फाउंडेशन” च्या माध्यमातून मिळाले नवे रूप
अकलूज : समाजात सण तर सगळेच साजरे करतात पण एखादा सण शिक्षणासाठी साजरा होत असेल तर ? आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा असाच एक सण आहे जो शिक्षणासाठी साजरा केला जातो. बकरी ईद ला दिल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या कुर्बानीला एक वेगळं स्वरूप देत पुण्यातील पैगंबर शेख यांनी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम ९ वर्षांपूर्वी सुरू केला. या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील १५०० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
याच उपक्रमाच्या अंतर्गत “सोशल मिडिया फाउंडेशन” च्या माध्यमातून राऊतनगर अकलूज मधील अंगणवाडीचे रंगकाम पूर्ण करून देण्यात आले. यावर्षी उपक्रमाचे ९ वे वर्ष आणि या माध्यमातून राऊतनगर मधील अंगणवाडीचे रंगकाम करून देता आले त्याचा आमच्या फाउंडेशनला आनंद होत आहे. असेच पुढेही जमेल ती शैक्षणिक मदत या माध्यमातून करत राहू असे सोशल मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष पैगंबर शेख बोलले.
शाहू फाउंडेशन चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांच्या फक्त एका शब्दावर अंगणवाडीचे रंगकाम करून दिले याबद्दल त्यांनी आभार मानले. सोशल मिडियाच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीमुळे ग्रामीण भागातील अकलूज शहरात काहीतरी करू शकलो याचा सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमात किशोर नाना घोलप, रफिक शेख, अमोल गव्हाणे, रंजना कदम मॅडम, शबाना तांबोळी मॅडम, प्रितीताई चव्हाण, लता भिसे मॅडम, तांबोळी मॅडम, महेंद्र अडगळे, महावीर भोसले, बाळू वाघे, अभिषेक खाडे, रोहित बोरावके, कबीर मुलाणी, तेजस उबाळे, रोहित कदम, विक्रम चौगुले, प्रदिप भोसले, कान्हा भोसले, तसेच कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लता भिसे मॅडम, तांबोळी मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हजारे मॅडम यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्यांचे आभार अविनाश भैय्या सोनवणे यांनी मानले.