अकलूजच्या मदिना मस्जिद ट्रस्ट कडून २०० सभासदांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप
अकलूज : देशाचा ७५ वा स्वतंत्रदिन अर्थात “आजादी का अमृतमहोत्सव” व “हर घर तिरंगा” अभियानात अकलूज शहरातील मदिना मस्जिद ट्रस्टकडून मशिदीच्या २०० सभासदांना घरोघरी जाऊन राष्ट्रध्वज व ध्वजकाठी वाटप करण्यात आली. तसेच ट्रस्टच्या वतीने प्रत्येक घरोघरी जाऊन काळजीपूर्वक राष्ट्रध्वज प्रत्यक्ष लावण्यात आले आहे. हर घर तिरंगा अभियानात प्रशासनाच्या नियमावली नुसार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी पर्यंत घरांवर तिरंगा लावण्यात येणार आहे. या अभियानात मुस्लिम समाजाने सक्रिय सहभाग नोंदवत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याकरता शहरात जोरदार तैयारी सुरू केली आहे.
अकलूज शहरात सर्व समाज ,व्यापारी व व्यवसाईक यांच्याकडून ही शहराच्या चौहीकडे तिरंगाची विद्युत रोषणाई, शुभेच्छाचे डिजिटल बोर्ड व तिरंगा राष्ट्रध्वजाने शहर गजबजून गेले आहे. या अमृतमहोत्सव कार्यक्रमात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला ह्या ही घरांवर तिरंगा लावूत शोभा वाढवण्यास हिरीरीने मदत करीत आहेत.