ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी एक्शन कमेटीची जिल्हा उपाध्यक्ष पदी लालू सौदागर यांची निवड
उस्मानाबाद : ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी एक्शन कमेटीची सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी लालू सौदागर यांची निवड करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे आ.अबुअसिम आजमी उस्मानाबादच्या दौरावर आले असताना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.ही निवड प.महाराष्ट्र अध्यक्ष सादीक कुरेशी, सोलापूर जिल्हाध्यक्ष अय्युब कुरेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटकांत सर्वसमावेशक योजना,अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी आ.आजमी यांनी पुढील सामाजिक कार्यास नुतन जिल्हा उपाध्यक्ष सौदागर यांना शुभेच्छा दिल्या. कुरेशी समाजाने व्यवसाईक उन्नती बरोबर शैक्षणिक प्रगती करणे जरूरी असल्याचे प.महाराष्ट्र अध्यक्ष सादीक कुरेशी यांनी यावेळी नियुक्ती वेळी उपस्थित सर्व कुरेशी बांधवांना आवाहन केले आहे. कुरेशी जमातीस शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संघटनेकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येईल असे अय्युबभाई कुरेशी यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष वाजिद कुरेशी, सरचिटणीस अकबर पटेल, इर्षाद कुरेशी,अफताब अकबर कुरेशी,बिलाल कुरेशी,इस्तेयाक कुरेशी,अजहर कुरेशी,जावेद कुरेशी आदी उपस्थित होते.