आपला जिल्हाआपले शहर

अकलुज पो. स्टेशन हद्दीत ४ घरफोडीतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

अकलूज : अकलूज शहर व पोलिस ठाणे हद्दीत मागिल काही दिवसांपूर्वी घरफोडीचे सत्र सुरूच होते.तद्नंतर शहरात नागरिकांत भीतीचे भयावह वातावरण निर्माण झाले होते.परंतु याच घरफोडी करणारे चोरांचा कर्दनकाळ ठरलेली “खाकी वर्दी” आषाढी वारीचे बंदोबस्त आटोपून पुन्हा शिताफीने सुगावा लावत घरफोडीतील चोरांच्या मुसक्या आवळण्यास सज्ज झाली आहे.
मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री हिमत जाधव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. डॉ. बसवराज शिवपुजे सो अकलुज उपविभाग अकलुज, व मा. पोलीस निरिक्षक श्री. अरुण सुगावकर सो अकलुज पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली अकलुज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सपोनि चौधरी, पोहेकॉ / ३०८ अभिजीत कुंभार, पोहेकॉ / १५८६ स्वरुपचंद शिंदे, पोहेकॉ/९८४ अमोल मिरगणे, पोहेकॉ/१४४७ विशाल घाटगे, पोहेकॉ / ३८२ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ / १०९८ विक्रम घाटगे, पोहेकॉ / ४०९ सुहास क्षीरसागर, पोहेकॉ / १५६७ शिकतोडे, पोकॉ ३६२ / मनोज शिंदे, पोकॉ / ६१७नितीन लोखंडे, पोकॉ/२२१६ अन्दर आतार सायबर पो. ठाणे यांनी अकलूज शहरातील, यशवंतनगर, गिरझणी येथे झालेल्या घरफोडी चोर्या उघडकीस आणण्याकरिता गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरुन दोन विधी संघर्षग्रस्त बालकांस ताब्यात घेवून तपास केला असता त्यांनी त्यांचे साथीदार आरोपी नावे १) उमेश प्रकाश काळे वय २९ वर्षे रा. मलीकपेठ, ता. मोहोळ जि. सोलापूर २) रोहित दिपक पवार वय २१ वर्षे रा. प‌द्मावतीनगर नवचारी, बागेचीवाडी, ता. माळशिरस व त्यांचे इतर साथीदार यांनी घरफोडी केलेचे कबुली दिली असून सदर तपासात ४ घरफोडीचे गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरील आरोपींकडून ४०,०००/- रु. चा १ तोळा वजनाचे सोन्याचा राणी हार कि. अं. २५,०००/- रू.ची ५०० ग्रॅम वजनाची चांदीची लगड, ब्रेसलेट, जोडवे कि. अं., १०,०००/- रू. चा इनटेल कंपनीचा एक एल.ई.डी. टी. व्ही. कि. अं., १५,०००/- रू. चा कॅनन कंपनीचा EOS 200DII डिजीटल कॅमेरा कि. अं.,१०,०००/- रु. किंमतीचे तांब्याची व पितळीची भांडी कि.अं., १०,०००/- रु. चा ओपो कंपनीचा A31 मोबाईल कि. अं., १०,०००/- रू. चा व्हीओ कंपनीचा Y20 मोबाईल कि. अं., २६००/- रु. रोख रक्कम असा एकुण १,२२,६००/- रु. किमतीचा वरीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालक व आरोपी यांचेकडुन अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे विरुध्द अकलुज पोलीस ठाणेस रितसर गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास सपोनि चौधरी, पोहेकॉ / १५६७ शिकतोडे, पोहेकॉ/१५८६ स्वरुपचंद शिंदे, पोहेकॉ/१४०७ पठाण हे करीत आहेत.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button