अकलूजसह जिल्ह्यातील १० नगरपरिषद,१ नगरपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले
अकलूज : सार्वत्रिक निवडणुका २०२२ राज्यातील ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्यात नगरपरिषद नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आयोगाने प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमानुसार आरक्षणसहित अंतिम प्रभाग व अंतिम प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्राची यादी ही दि.९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याकरिता भारतीय हवामान खात्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे. सदरच्या निवडणुका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र.१९७५९/२०२१ व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील. सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२२ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता कालावधीत उपलब्ध आहे.तसेच शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस वगळत नामनिर्देशक पत्र स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची दि. २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वा.छाननी व वैधारित्य नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम कालावधी दि. ४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसानंतर लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येईल. या निवडणुकीचे मतदान दि १८ ऑगस्ट रोजी स.७.३० ते सायं.५.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. तसेच या निवडणुकीची मतमोजणी व निकाल दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी स.१० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.