मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माळशिरस शहर मार्गदर्शक पदी हरून शेख यांची वर्णी
माळशिरस : मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या माळशिरस शहर मार्गदर्शक पदी हरून वली शेख (सर) यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी माळशिरस नगर विकास युवक आघाडी अॅड. दादासाहेब पांढरे पाटील, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रशीदभाई शेख,नगरसेवक कैलास वामन,अॅड.साजिद शेख नितिन जाधव,शहाबाज शेख,शहराध्यक्ष आजिम मुलाणी,कार्याध्यक्ष भैया इनामदार,रियाज तांबोळी आदींनी शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक जीवनात अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जडणघडण करण्यात शिक्षकांची जशी महत्त्वपूर्ण भूमिका असते.याच प्रकारे भविष्यात शेख सरांच्या माध्यमातून मुस्लिम समाजास शैक्षणिक,राजकिय व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी समितीच्या सर्व शहर पदाधिकाऱ्यांना दिशा व गती देण्याचे काम होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांनी मत व्यक्त केले. भविष्यात शहरात समितीस नवचैतन्य व ऊर्जा देण्यात शेख सर नक्कीच बहुमोल मार्गदर्शन करतील यात शंका नाही.