AIMIM पक्षाच्यावतीने पिंपरी विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक – धम्मराज साळवे
पिंपरी-चिंचवड (युवापर्व) : आगामी काळात महाराष्ट्राच्या २०२४ विधानसभा निवडणूका जाहीर होतील त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा २०६ हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून एमआयएमचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे हे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रदेशाध्यक्ष मा. खा.इम्तियाज जलील साहेब यांना पत्रक पाठवण्यात आले आहे.
साळवे हे स्वतः पिंपरी विधानसभेतील रहिवासी असून २०१२ पासून सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चळवळीत अग्रेसरपणे सक्रिय सहभागी असल्याचे अनेकदा पाहण्यास मिळाले आहे. दिनांक ३१ मार्च २०१६ रोजी मा. अकील मुजावर साहेब यांच्या नेतृत्वात माझी पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती झाली होती. तेंव्हापासून आजपर्यंत गेली ०८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करत आहेत. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या पदांवर कार्यरत आहे . गुजरात येथील सार्वत्रिक निवडणूक मध्ये पक्षाच्या आदेशानुसार (अहमदाबाद ,भरूच ,मडोसा ,गोध्रा )स्टार प्रचारक म्हणून सभा केल्या ,महाराष्टारील बीड ,जालना ,अहमदनगर ,पुणे येथे स्टार प्रचारक कार्य केले ,वेळोवेळी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,अहमदनगर ,कोल्हापूर ,सांगली ,सातारा पक्ष बांधणी केले . २०१६ पासून AIMIM पक्षाच्या माध्यमातून जनहिताचे मुद्दे घेऊन अनेक आंदोलन मोर्चे केले तसेच शैक्षणिक,रोजगार,महिला सक्षमीकरण,आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात सातत्याने विविध कार्यक्रम,जनजागृती असेल अश्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,राज्य सरकार यांच्यासोबत पत्रव्यवहार करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम असेल,दलित मुस्लिम समाज यांच्यावरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे असतील तसेच भ्रष्टाचाराची प्रकरणे असतील याविरोधात सातत्याने रस्त्यावरील व कायदेशीर संघर्ष केला आहे. २०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक AIMIM पक्षाने प्रथमच निवडणूक लढवली होती.जय भीम जय मीम नारा देऊन सोशल इंजनिअरिंग चा प्रयोग करून १४ उमेदवार दिले होते त्यापैकी बहुजन समाजाचे ९ व मुस्लिम समाजाचे ५ उमेदवार दिले होते व या निवडणुकीत पिंपरी विधानसभेत पक्षाला १८५०० पेक्षा अधिक मतदान मिळाले होते. पिंपरी विधानसभेत दलित व मुस्लिम समाजाची संख्या निर्णायक असून पक्षाने उमेदवारी दिली तर विजय निश्चित आहे. युवा सुशिक्षित उमेदवार म्हणून निश्चितच मतदार संघात मला पसंती मिळेल असा त्यांना विश्वास आहे.
राज्यातील सार्वत्रिक निवडणूका २०२४ पिंपरी विधानसभेकरिता उमेदवारी निश्चित करण्यात यावी जेणेकरून प्रचार प्रसारासाठी वेळ भरपूर मिळेल. एमआयएम पक्षाचा निष्ठावंत भीमसैनिक इच्छुक असल्याने पक्ष नक्कीच माझा विचार करेल . सदरचे पत्रक हे राष्ट्रीय अध्यक्ष खा म.असदुद्दीन ओवैसी साहेब ,महासचिव अकिल मुजावर यांना ही ह माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.