आपला तालुकाग्रामीणविशेषसामाजिक
भारत सरकारच्या नोटरी पदी अॅड.सुमित सावंत
माळशिरस (युवापर्व) :- केंद्रीय विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची नियुक्ती यादी दि. १५ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून यामध्ये माळशिरस येथील ॲड. सुमित सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे . ॲड. सुमित सावंत हे माळशिरस न्यायालयात गेल्या दहा वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, त्यांच्या नियुक्तीचे माळशिरस परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.