अकलूज (युवापर्व) : महाराष्ट्र राज्य एनयूबीसी चे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे उपस्थितीत व राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश यादव यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश एन यू बी सी च्या राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी बहुजन सेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आली.मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क पुणे येथे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना, एनयूबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेत हे पद नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी एस् गीता,संग्रामनगर अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बळवंत रासकर,सुनील ज्ञानेश्वर कांबळे,विलासनंद विठ्ठल गायकवाड यांच्यासह शेतकरी संघटना व एन यू बी सी चे वीस राज्यातील मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड क्लासेस एससी एसटी अॅन्ड मायनाॅरिटी अर्थात एन् यू बी सी च्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी अकलूज येथील नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजले पासून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.