महापरिनिर्वाण दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एक वही एक पेन अभियान संपन्न
पिंपरी-चिंचवड(युवापर्व) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने बाबासाहेबांना अपेक्षित अभिवादन करण्यासाठी एक वही एक पेन अभियान राबवण्यात आले. पिंपरी भिमसृष्टी स्मारक येथे सकाळी 10 ते सायंकाळी 10 पर्यंत वही पेन संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 60 डझन वह्या व 40 डझन पेन जमा झाले.
या उपक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील अनेक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक शेत्रातील मान्यवरांनी व तसेच आंबेडकर अनुयायांनी सहभाग घेऊन वही पेन दान देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.वही, पेन,पुस्तके संकलन अभियानाच्या माध्यमातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य हे पिंपरी चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहे.तरी ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्यांनी संस्थेच्या www.Rayatvvm.org वेबसाईटला भेट देऊन संपर्क साधावा.अथवा संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या 9604683459 या क्रमांकावर संपर्क साधावा.
वही पेन संकलन करण्याकरिता करिता रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,शहर प्रभारी अध्यक्ष योगेश कांबळे, अजय चक्रनारायण,स्वराज कांबळे,अभिजित लगाडे,निलेश आठवले,समाधान गायकवाड,भाग्यश्री आखाडे,सचिन सूर्यवंशी, प्रशांत इत्यादी पदाधिकारी यांनी या अभियानासाठी मेहनत घेतली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण यांनी यावेळी असे मत व्यक्त केले की आपण बाबासाहेबांचे भक्त नाही तर अनुयायी बनण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री आपल्याला दिली याच त्रिसूत्री चे अनुकरण करत रयत विद्यार्थी विचार मंच असे समाजपयोगी शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत आहे व पुढेही राबवत राहील.