अकलूज (युवापर्व) : अकलूज येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या बेमुदत साखळी उपोषणास मुस्लिम समाज, हजरत टिपू सुलतान यंग ब्रिगेड व मुस्लिम समन्वय समितीकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज अकलूज यांना पाठिंब्याचे निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष मोहसिन शेख, शहराध्यक्ष इन्नूस सय्यद, उपाध्यक्ष फारुक शेख, मुस्लिम समन्वय समितीचे शहराध्यक्ष समिरभाई काझी, शोएब बागवान, सलमान कुरैशी, सादिक कुरैशी,जावेद बागवान,जाकिर कोरबू आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचे संघर्ष यौद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यासह अकलूज शहरात ही साखळी उपोषण सध्या सुरू आहे. राज्य सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ निर्णय घेवून आरक्षण जाहीर करावे ; अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या प्रत्येक लढाईत मुस्लिम समाज नेहमीच सोबत राहणार असून मराठा आरक्षणावर तात्काळ निर्णय राज्य सरकारने घ्यावा.
Jack Jarvis