करमाळ्यातील मराठा आंदोलकांच्या साखळी उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
करमाळा(युवापर्व): संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची धगधग चालू असताना त्याचं धगधगीची ठिणगी करमाळ्यात पडली आहे . सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ, जिल्हा संघटक विलास कांबळे, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे, तालुका महासचिव नंदू कांबळे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ,तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शहर उपाध्यक्ष जितेश रणबागूल, उपाध्यक्ष यशवंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रोहित खरात, अशोक पोळके, मराठा क्रांती मोर्चाचे विजय लावंड, सचिन गायकवाड, अमोल यादव, विनय ननवरे, सचिन घोलप, सुनिल सावंत, राहुल सावंत या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच यावेळी बोरगाव ग्रामस्थांनी ही आपला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव बंदी चा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. या आंदोलन परिसराच्या ठिकाणी ” एक मराठा, लाख मराठा ” च्या घोषणाबाजीने दणदणून गेले होते.