योग,प्राणायाम बरोबरच ध्यान ही काळाची गरज – डॉ.लक्ष्मणराव आसबे
इंदापूर(युवापर्व) : इंदापूर शहरात पतंजली योग परिवाराच्या वतीने येणाऱ्या नवरात्र उत्सवाचे निमित्ताने कामधेनु परिवाराचे संस्थापक समाज भूषण डॉ लक्ष्मणराव आसबे यांचे ध्यान व कुंडलिनी शक्ती जागरण याबाबत व्याख्यान आज दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे स्थायी योग वर्गामध्ये पहाटे 5:15 ते 7 आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास बहुसंख्येने पुरुष व महिला साधक उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या दरम्यान कुंडलिनी शक्ती जागरण होण्याचा सर्वोच्च काळ असतो. योग प्राणायाम याचबरोबर ध्यानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व सर्वसाधकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचे पतंजली योग परिवाराचे अध्यक्ष दत्तात्रय अनपट यांनी सांगितले.आध्यात्मिक उत्थान तसेच संपूर्ण रोग मुक्तीसाठी जीवनात उत्साह, समाधान आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी योग आणि ध्यान आवश्यक आहे. त्याचबरोबर आंतरिक शक्ती किती महत्वपूर्ण कामगिरी करते याबाबत प्रबोधन डॉ.आसबे यांनी सर्वसाधकांपर्यंत अगदी सोप्या भाषेत समजावून दिलं.
व्याख्यान झाल्यानंतर पतंजली योग परिवाराचे सदस्य जितेंद्र माने देशमुख यांची दि एन्व्हायरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ आसबे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पुरुष व महिला साधकांनी संघटितपणे प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मखरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पतंजली योग परिवाराचे उपाध्यक्ष मदन चव्हाण यांनी मानले.