अकलूज (युवापर्व) : मुस्लिम समन्वय समितीच्या अकलूज शहर संपर्क प्रमुख पदी नाजिरहुसेन मोहोळकर तर शहर उपाध्यक्ष पदी आलिम बागवान यांची निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष समिरभाई काझी यांनी केली आहे.
सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व म्हणून मोहोळकर व बागवान यांचे प्रत्येक समाजातील लोकांशी व्यवसाय कार्यातून सदैव संवाद असतो. याच जनसंपर्काचा फायदा भविष्यात समितीस व्हावा म्हणून ही सार्थ निवड करण्यात आली आहे. तसेच समितीने दिलेली जबाबदारी सर्वस्वी स्वीकारून कार्यकर्त्यांची एकसंध फळी निर्माण करून संघटन सक्षम बनवावे असे मत सत्कार प्रसंगी काझी यांनी व्यक्त केले.
मुस्लिम समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी कार्य करणे या समन्वय समितीचे मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणातून समाजाचे प्रतिनिधित्व निर्माण करणे ही गरजेचे असल्याचे यावेळी रियाज मुजावर यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना अॅड दादासाहेब पांढरे पाटील, प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख, रियाजभाई मुजावर, तालुका उपाध्यक्ष मोहंमद बाबा पठाण,माळशिरस शहराध्यक्ष समिर मुलाणी,आनंदनगर शहराध्यक्ष इक्बाल शेख,पत्रकार नौशाद मुलाणी,मोहसिन बागवान,मोहिद्दीन शेख, वसिम पटेल,आयान तांबोळी आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते.
1n