पुसेसावळी घटनेतील दंगेखोरांना कठोर शिक्षा करा ; अकलूज मुस्लिम समाजाची मागणी
प्रांत कार्यालयास निवेदन देवून मुस्लिम बांधवांकडून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध
अकलूज (युवापर्व) : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीत मृत पावलेला नुरूलहसन शिकलगर वय – २७ वर्ष व इतर गंभीर प्रकृती असलेल्यांचे मारेकरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी. इंस्टाग्रामवर आरोही नावाचे फेक आकाउंट काढून एका मुस्लिम बांधवाचे इंस्टाग्राम अकाउंट्सची माहिती प्राप्त करून ही दुर्दैवी घटना समाजविघातक कृतीकडून घडवण्यात आली. सदरील घटना ही मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ मशिदीत घडलेली आहे ; हे अत्यंत निंदनिय आहे ? सरकारकडून घटनास्थळी भेट दिली गेली परंतु पीडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणे सध्याचे परिस्थिती पाहता आवश्यक होते. मात्र सर्व काही अलबेल चालल्याचे आव आणून अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर एकतर्फी अन्याय ही सरकारकडून केला जात आहे. या असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे.
पुसेसावळीत हिंदु-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने नांदत असताना काही विध्वंसक वृत्तीस सरकारकडून अभय दिला जातोय का ? अशी शंका मुस्लिम बांधवांना निर्माण झाली आहे. समाजमाध्यमात आक्षेपार्ह पोस्ट करणारा आरोपी हा अल्पसंख्याक मुस्लिम नसताना मुस्लिम बांधवाचा जीव घेणारे मोकट का ? मुस्लिम समाजाला दुय्यम वागणूक का ? त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करणे ही व्यर्थ आहे का ? हा आमचा सरकारला संतप्त सवाल आहे.अकलूज शहर मुस्लिम समाज बांधव, हजरत टिपू सुल्तान यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सदरीच्या या घटनेमध्ये मृत (शहीद) पावलेले २ लोकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी.या घटनेमध्ये जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तींना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी. घटनेमध्ये नुकसान झालेल्या लोकांचे घरे व दुकाने यांची सरकारने पुर्नवर्सन करून द्यावे; अशी मागणी करण्यात आली आहे.
सदरील घडलेल्या घटना निषेधार्थ असून अकलूज शहर मुस्लिम समाज बांधव तीव्र निषेध नोंदवत आहे. सदरील घटनेतील आरोपींविरुद्ध निष्पक्ष पध्दतीने कारवाई करून यामागील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा. या बाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाला देण्यात आले.सोबत सातारा पोलीस यांची गुन्ह्यातील हकिकत जबाब प्रत जोडण्यात आली आहे. याठिकाणी अकलूज शहरासह पंचक्रोशीतील शेकडो मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
आपण आपल्या सर्व प्रतिक्रिया आमच्या न्यूज पोर्टलवर नोंदवू शकता..
Xiomara Delarosa