करमाळा तालुका दुष्काळ जाहीर करा ; या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको
करमाळा(युवापर्व) : संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच करमाळा तालुक्यांत देखील ८० टक्क्याही पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी करमाळा शहर व तालुका शाखेच्या वतीने मौलाली माळ बायपास याठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून मागणी करण्यात आली. या आंदोलनातील मागण्या करमाळा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा. करमाळा तालुक्यात जनावरांना चारा छावण्या सुरू कराव्यात.तालुक्यातील वाड्या वस्त्या वर पाण्याचे टँकर सुरू करावेत ; या आशयाचे निवेदन महसूल प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, जिल्हा संघटक विलास कांबळे ,शहर अध्यक्ष विशाल लोंढे ,तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, तालुका महासचिव नंदू कांबळे, शहर उपाध्यक्ष जितेश रणबागूल, उपाध्यक्ष यशवंत कांबळे, सचिन घोडके, उस्मान मदारी, उमर मदारी, मेहबूब मदारी,अस्लम मदारी व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.