मराठांना आरक्षण मिळावे व जालना हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआय युवक जिल्हाध्यक्षाचा राजीनामा
यशपाल कांबळे यांचा रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा
करमाळा(युवापर्व) – जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानूष लाठीचार्जचा करमाळासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पाळत तीव्र निषेध करण्यात आला . मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे , म्हणून अंतरवली सराटा येथील माता भगिनींवर जो अमानूष भ्याड लाठी चार्ज झाला त्याचा काही दिवसांपासून मराठा व बहुजन समाज निषेध करत आहे. महाराष्ट्रत काही ठिकाणी बस जाळण्यात आल्या तर अनेक गावे व शहर बंद करण्यात आले . करमाळा येथे बुधवारी ता ६ रोजी सकल मराठा व बहुजन समाज यांच्या वतीने भव्य विराट मोर्चा काढण्यात आला. त्यात काही महिला ,लहान मुले-मुली, महिला संघटनांनी व पक्षाने आपला पाठिंबा जाहीर करून निषेध व्यक्त केला.
रोशेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असलेले करमाळा तालुक्यातील इतिहासत नोंद करून घ्यावी असा निर्णय यशपाल कांबळे यांनी घेतला आहे.सामाजिक क्षेत्रात आपले चुलते नागेश दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षांपासून ” राजकारण कमी, पण समाजकार्य जास्त ” असा वसा व वारसा जपत ते सामाजिक कार्याची वाटचाल करत आहेत. डिसेंबर २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते . अजून तीनहून वर्ष काम पाहणार होते . आपण समाजाचे काही तरी देण लागतो या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज मराठा समाजासाठी आपल्या पदाचा व आपल्या परिवाराचा विचार न करता निस्वार्थी पणे फक्त समाजकार्य केले. तेच कार्य पुढे नेण्याचे काम आज यशपाल कांबळे करत आहेत. आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असून मराठा बांधवांना पाठिंबा देत रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदांचा राजीनामा ग्रामसेवक व तहसीलदार यांच्या कडे पाठवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समर्थन केले आहे.