आपले शहरचालू घडामोडी

अकलुज नगरपरिषदेचे प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश; २१ एप्रिल नगरपरिषदेत अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख

अकलुज (युवापर्व) : अकलुज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कळविण्यात येते की अकलुज नगरपरिषदेचा केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट झालेला आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधण्याकरिता एकूण २.५ लक्ष अनुदान स्वरूपात मिळणार आहे .

तरी जो नागरिक अकलूज नगरपरिषद हद्दीतील रहिवासी आहे, त्याचे इतरत्र ठिकाणी पक्के घरे नाही आणि स्वतःच्या मालकीची जागा आहे. व नागरिकांना स्वतःची पक्के घरे बांधायचे आहे या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह फार्म नगर परिषद कार्यालयामध्ये दि. २१ एप्रिल २०२३ पर्यंत जमा करावा. शहरातील सर्व इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अकलुज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button