विनापरवाना वृक्ष तोडल्याने अकलूज नगरपरिषदेकडून गुन्हा दाखल करून कारवाई
अकलूज (युवापर्व) : अकलूज नगरपरिषद हद्दीतील श्री. भारत संभाजी सातपुते यांनी दि.१५ मार्च २०२३ रोजी स.१० वा जेसीबीच्या साह्याने झाड मोडून पाडले होते. सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरपरिषदेचे वृक्ष अधिकारी श्री.नरेंद्र पाटोळे यांनी चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले.त्यामुळे अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. दयानंद गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करत झाड तोडणारे भारत सातपुते यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये वृक्ष प्राधिकरण झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अकलूज नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय नगरपरिषद हद्दीतील झाड अथवा झाडांच्या फांद्या नागरिकांनी तोडू नयेत तसेच नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले असून त्याचे संरक्षणाकरिता ट्री गार्ड बसवली आहेत. सदरचे ट्री गार्ड काही ठिकाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच चोरी करताना आढळल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. वृक्षारोपण व त्यांचे जतन करणे करिता अकलूज नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांच्या वतीने करण्यात आले आहे.