अकलूजच्या महिला पो.हे.काॅ.नाजमीन तांबोळी यांना राष्ट्रीय महिला उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान
अकलूज (युवापर्व) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रसंगी “सशक्त नारी, सशक्त भारत ” अभियानांतर्गत राष्ट्रीय महिला संसद २०२३ ” उत्कृष्ट महिला ” सन्मानाने अकलूज पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पो.हे.काॅ. नाजमीन रियाज तांबोळी यांना गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सोहळा महाराष्ट्र सदन ,नवी दिल्ली येथे दि.१२ मार्च रोजी संपन्न झाला.
राष्ट्रीय महिला संसद 2023 यामध्ये बालिकांवर होणारे विनयभंग,अत्याचार याविरुद्ध राष्ट्रीय चर्चासत्रासह सहभागी होऊन पो.हे.काॅ.सौ.नाजमीन रियाज तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अकलूज शहरासह ग्रामीण भागात महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार, शालेय विद्यार्थींनींच्या सुरक्षासाठी निर्माण केलेले दामिनी पथक च्या माध्यमातून त्यांनी सक्षमपणे भूमिका बजावली आहे. अकलूज पोलीस स्टेशनला येणारे पती पत्नीचे घरगुती वादविवाद समोपचाराने सोडविण्यास नेहमी त्या पुढे असतात. त्याच्या सन्मानाने सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.